कवितेबद्दल :
आपल्या आयुष्यात खूप चढ उतार येतत कधी सुख असत तर कधी दुख  अश्यात आपल्याला आयुष्यात खूप मानस भेटत .काही फक्त तुमच्या सुखाच्या काळात तुमच्या सोबत असतात आणि तुमची पारीतिथी वाईट झाली कि तुम्हाला सोडून जातात .पण तुमच्या सोबत अश्या काही गोष्टी नेहमी असतात ज्या सुखात आणि दुखत शेवट पर्यंत तुमच्या सोबत असतात. त्या पैकी एक छत्री.
मराठी कवीता प्रिय मैत्रीण छत्री
प्रिय मैत्रीण  छत्री  
पाउस म्हंटल कि  
चिडचिड  होते  
सांदीत  पडलेली छत्री  
पुन्हा नवी मैत्रीण होते .... 
घरातली अडगळीतली जागा  
पुन्हा पुन्हा पाहून होते  
माझी प्रिय छत्री  
तुला शोधताना  
मन खूप अधीर होते  
तू दिसतेस अचानक एका कोपऱ्यात  
गालफुगून चिडलेली  
पण नशीब तुला रागावता येत नाही  
वर्षभराचं  एकटेपण भांडून सांगता येत नाही  
पण एक सांगू  
तू आणखी हि तितकीच सुंदर आहेस जशी 
मागच्या वर्षी होती 
शप्पत खरं  ...मी खोटं  बोलत नाही  
तुला पुन्हा सोबत घेउन फिरायचंय   
पाउसात थंड वाऱ्यात  
तुझा घेउन हातात हात ....... 
प्रॉमिस ...क्षण भर हि दूर ठेवणार नाही आता  
मग मी ऑफिसात असो कि घरात .... 
तू ना कधी रुसली ना फुगली  
पावसात कित्तेकदा माझ्या साठी भिजली  
ढगांच्या आवाजात मी घाबरलो बऱ्याचदा  
पण तू  माझी हिम्मत बनली....... 
माझी प्रिय मैत्रीण छत्री  
काश तुझ्या सारखी आमची मन असती  
तर माणुसकीची  उंची मोजता आली नसती  
तुझ्यातली आपुलकी थोडी आमच्यात आली असती  
तू तर पावसाला रोखतेस  
आम्ही कित्येकांच्या  डोळ्यातली आसवे रोखली असती ...... 
अभय शेजवळ  
दिनांक  १२/०६/२०२१
Related Topics
Tags:
Marathi kavita
